ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धक्कादायक ! धनंजय मुंडेंवर बलात्काराचा आरोप ; तरुणीची पोलिस आयुक्तांकडे तक्रार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी बलात्कार केल्याचा आरोप एका तरुणीने पोलिस आयुक्त मुंबई पोलिस यांना दिलेल्या तक्रार अर्जात केला आहे. दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या तक्रारीत तिने धनंजय पंडीतराव मुंडे हे आपले नातेवाईक असल्याचे नमुद केले आहे. धनंजय मुंडे यांनी माझ्यावर अत्याचार केला असल्याची माहिती सदर महिलेने तिच्या ट्वीटर अकाऊंट वरून केला आहे.

या तक्रार अर्जात सदर पिडीत तरुणीने म्हटले आहे की धनंजय मुंडे यांचे समवेत तिची ओळख सन 1997 मधे इंदोर (मध्य प्रदेश) येथे झाली होती. त्यावेळी तिचे वय 16 – 17 वर्ष होते. शरीर संबंध प्रस्थापित करतांना व्हिडीओ शुट केल्याचे देखील पिडीत तरुणीने तक्रारीत म्हटले आहे. बॉलीवुड मधे गायीका होण्यासाठी मदत करण्याचे आमीष दाखवून अत्याचार करण्यात आल्याचे तरुणीने तक्रारीत म्हटले आहे.


दरम्यान सदर महिलेने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना देखील ट्वीट केले आहे. त्याचबरोबर देशाचे पंतप्राधान नरेंद्र मोदी यांनाही ट्वीट केले आहे. मुंबई पोलीस, मुंबई पोलीस आयुक्त, सुप्रिया सुळे, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना ट्वीटमध्ये टॅग करत मदत करण्याची विनंती देखील केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!