---Advertisement---

नायलॉन, प्लॅस्टिक, सिंथेटिक मांजाला प्रतिबंध ; पोलीस आयुक्त शिंदे यांचे आदेश

On: January 19, 2021 5:41 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : नायलॉन मांजा, प्लॅस्टिक आणि सिंथेटिक दोराचा वापर करून पतंग उडविण्यासाठी प्रतिबंध घालण्यात आला आहे. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी जारी केले आहेत.

नायलॉन मांजा, प्लॅस्टिक आणि सिंथेटिक दोरा हे नैसर्गिकरित्या विघटन न होणारे साहित्य आहे. निसर्गाला आणि पर्यावरणाला घातक असून गटारी, पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन, नद्या, नाले यामुळे तुंबतात. गोवंश जनावरे चारा खाताना चुकून नायलॉनचा मांजा खातात. यामुळे प्राण्यांना शारिरीक इजा होतात. पतंगाच्या मांजामुळे आकाशात उडणारे पक्षी जखमी होण्याची शक्यता असते. दुचाकीस्वारांचा अपघात, जखमी होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे 14 फेब्रुवारी 2021 पर्यंत नायलॉन मांजा, प्लॅस्टिक आणि सिंथेटिक दोरा वापरणे, बाळगणे, विक्री किंवा साठा करण्यास प्रतिबंध घालण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!