---Advertisement---

बलात्कार प्रकरणात अडचणीत सापडलेले धनंजय मुंडे शरद पवारांच्या भेटीला

On: January 13, 2021 7:41 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई | बलात्काराच्या प्रकरणात अडचणीत सापडलेले राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमूर्ती धनंजय मुंडे यांनी नुकतंच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची सिल्व्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पवार- धनंजय मुंडे यांच्यात अनेक मिनिटं गुफ्तगू झालं.

 

धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना भेटून त्यांची सविस्तर भूमिका पवारांसमोर मांडली. याअगोदर त्यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांची भूमिका महाराष्ट्रासमोर मांडली होती. त्यांच्या फेसबुक पोस्टनंतर किंबहुना खुलाशानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत होते. अखेर मुंडे यांनी सिल्वर ओकवर जाऊन शरद पवार यांच्याशी याविषयी सविस्तर चर्चा केली. तसंच त्यांची भूमिका स्पष्ट केली

 

रेणू शर्मा या गायक तरुणीने धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप केले आहेत. शर्मा यांनी पोलीस तक्रारीची कॉपीही ट्विट केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांना खुलासा करावा लागला. रेणू शर्मा मला पैशाच्या कारणास्तव ब्लॅकमेलिंग करत आहेत. माझे रेणू यांची बहिण करुणा शर्मा यांच्याशी परस्पर सहमतीने संबंध आहेत. तसंच या संबंधातून आम्हाला दोन मुलंही आहेत. त्यांची जबाबदारीदेखील मी घेतली आहे, असं स्पष्टीकरण धनंजय मुंडे यांनी दिलं.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!