अक्कलकोट,दि.१३ : बिलोली येथे मातंग समाजाच्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिचा निघृण खून करण्यात आला. त्या घटनेच्या निषेधार्थ मातंग समाजाच्यावतीने (उद्या) सोमवारी निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मातंग समाज व मातंग एकता आंदोलनाचे प्रमुख वसंत देडे यांनी दिली आहे.
बिलोली (जि.नांदेड) येथे मातंग समाजाच्या एका सोळा वर्षीय मूकबधिर मुलीवर अत्याचार करुन तिचा निघृण खून करण्यात आला आहे.ही घटना निंदनीय आणि निषेधार्ह आहे, असे देडे यांनी म्हटले आहे. तरी सदरील मोर्चात मातंग समाजातील शहर व तालुक्यातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देडे यांनी केले आहे.










