---Advertisement---

….म्हणून सुरेश रैनासह ३४ बॉलिवूड सेलिब्रिटींवर गुन्हा झाला

On: December 22, 2020 3:45 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई । भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैनासह बॉलिवूड सेलिब्रिटींविरोधात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील पबमध्ये पार्टीदरम्यान कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्याविरोधात आहे.मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळच असलेल्या ड्रॅग्नोफ्लाय पबमध्ये सुरेश रैनासह उपस्थित असलेल्यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या पबवर पोलिसांनी धाड टाकली. त्यानंतर रैनासह ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

सुरेश रैनासह बॉलिवूड सेलिब्रिटी अशा एकूण ३४ जणांविरोधात पोलिसांनी कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या पबमध्ये कोविड नियम पायदळी तुडवल्याचा आरोप आहे. कुणीही मास्क लावला नव्हता. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे नियम धुडकावून लावले. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या पार्टीत दिग्गजांसह बॉलिवूड सेलिब्रिटीही सहभागी झाले होते. मात्र, कुणाचेही नाव अद्याप समोर आलेले नाही.

 

क्लबच्या संचालकावरही कारवाई करण्यात आली आहे. सुरेश रैना हा या वर्षात विविध कारणांनी चर्चेत राहिला आहे. यूएईत झालेल्या आयपीएल स्पर्धेच्या काही दिवस आधीच ऑगस्टमध्ये रैनाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली होती.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!