बीड । येणाऱ्या हंगामात बीड जिल्ह्यातील मुगींमधील शिवपार्वती साखर कारखाना सुरु करणार असल्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे. परळी-घटनांदूर-पिंप्री ते पानगाव या रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. येत्या एप्रिलपर्यंत कारखान्याचे २५ टक्के काम पूर्ण करणार असल्याची माहिती धनंजय मुंडे यांनी दिली.
येणाऱ्या काळात मतदारसंघातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचण येणार नाही या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, येत्या हंगामात मुगींमधील शिवपार्वती साखर कारखाना सुरु करणार असून एप्रिलपर्यंत कारखान्याचे २५ टक्के काम पूर्ण करणार. असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं. घाटनांदूर भागात कोणताही कारखाना नाही आहे. मात्र, येणाऱ्या काळात घटनांदूर भागात मोठा उद्योग आणणार आहे. त्याची घोषणाही लवकर असल्याचे धनंजय मुंडेंनी यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, परळी-घटनांदूर-पिंप्री ते पानगाव या रस्त्याच्या कामावर लोकांनी लक्ष द्यावं. येत्या ९ महिन्यात या रस्त्याचे काम पूर्ण कार्याचे आपलं लक्ष आहे. पश्चिम महाराष्ट्रात ज्यापराकाराची दर्जेदार काम होतात त्याचप्रमाणे आपल्या मतदार संघातही तशी काम होतील यासाठी प्रत्यनशील राहील असं वचनही धनंजय मुंडेंनी यावेळी दिलं.