---Advertisement---

रावसाहेब दानवेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा बच्चू कडूंनी घेतला समाचार….म्हणाले

On: December 10, 2020 12:02 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई | केंद्रातील मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे. गेल्या 15 दिवसांपासून राजधानी दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे.

दरम्यान, या आंदोलना आंदोलनाच्या पाठीमागे चीन आणि पाकिस्तान या देशांचा हात आहे, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.  त्यांच्या या वक्तव्याचा खरपूस समाचार राज्यमंत्री बच्चू कडू यांनी घेतला आहे. शेतकऱ्यांबद्दल अस वक्तव्य करणाऱ्या दानवेंना घरात घुसून मारायची वेळ आलीय असा थेट हल्लाबोल बच्चू कडू यांनी केला आहे.

रावसाहेब दानवे यांचे म्हणणे दुर्दैवी आहे. त्यांचा डीएनए एकदा चेक करावा लागेल. त्यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे; की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावे लागेल,” असे बच्चू कडू म्हणाले. दरम्यान, बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेच्या वतीने औरंगाबादेत रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर बुधवारी आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रहार संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी, दानवे यांच्या घरासमोर रक्तदान करुन आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, या आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांनी दानवे यांच्या घरासमोर बसून घोषणाबाजी केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!