---Advertisement---

शिवसेनेच्या मंत्र्यांनीच मुख्यमंत्र्यांचे आदेश धुडकविले

On: February 23, 2021 1:25 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबईः शिवसेनेचे मंत्री संजय राठोड हे आज मंगळवारी वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी गडावर दर्शनासाठी आलेले आहेत. पुजा चव्हाण आत्महत्येनंतर ते 15 दिवसांपासून अलिप्त होते. त्यांच्या भूमिकेकडे आणि हालचालीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. आज शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांच्या समर्थनार्थ बंजारा समाज बांधव आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. दरम्यान राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी घातली आहे. गर्दीवर देखील बंदी आहे. मात्र असे असतांना पोहरादेवी गडावर मोठी गर्दी झाल्याने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. दरम्यान यावर भाजप नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते सुधीर मुंगटीवार यांनी यावरुन शिवसेनेला लक्ष केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला शिवसेनेचे मंत्रीच केराची टोपली दाखवितात, शिवसेनेचे मंत्रीच मुख्यमंत्र्यांचे आदेश पाळत नाहीत असे आरोप सुधीर मुंगटीवार यांनी केले आहे.

भाजपने मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला प्रतिसाद देत गर्दी होऊ नये यासाठी आंदोलन रद्द केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचा कार्यक्रमही रद्द केला आहे. मात्र शिवसेनेचे मंत्रीच गर्दी होईल असे कृत्य करीत असल्याचे आरोप होत आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!