---Advertisement---

सोलापुरात श्रीगोंदा-बेलवंडी स्थानकांदरम्यान मालगाडीचे ७ वॅगन घसरले

On: December 23, 2020 11:58 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर :  सोलापूर रेल्वे विभागातील श्रीगोंदा – बेलवंडी स्थानका दरम्यान बुधवारी पहाटे मालगाडीचे १२ डबे घसरल्याने मनमाड-दौंड रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.  या मार्गावरून धावणाऱ्या पाच गाड्या पुणेमार्गे वळविण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दौंडकडून मनमाडकडे ४२ डबे असलेली मालगाडी सिमेंट घेऊन जात होती. पहाटे नगर जिल्ह्यातून जात असताना श्रीगोंदा ते बेलवंडी स्टेशनच्या दरम्यान गाडीचे बारा डबे रुळावरून घसरले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा विस्कळीत झाली.

वेळापत्रकानुसार धावत असलेल्या गाड्या अन्य मार्गाने वळविण्यात आल्या आहेत. त्यामुळे त्यांना पुढे जाण्यास उशीर होणार आहे. अपघात झाला तेव्हा या मार्गावरून धावत असलेल्या गाड्या जवळच्या स्थानकांत थांबविण्यात आल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!