---Advertisement---

हाफिज सईदला 10 वर्ष तुरुंगवासाची शिक्षा

On: November 19, 2020 6:17 PM
Follow Us:
---Advertisement---

कराची : मुंबईवरील वर्ष 2008 मधील 26/11 च्या गाजलेल्या हल्ल्याचा सूत्रधार, कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याला पाकिस्तानच्या पंजाब न्यायालयाने शिक्षा ठोठावली आहे. दहशतवादी कारवायांना आर्थिक पुरवठा करण्याच्या दोन प्रकरणांत ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. यावेळी दहशतवादी हाफिज सईदसमवेत जमात-उद-दावा या दहशतवादी संघटनेच्या चार अन्य सदस्यांनाही शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रांनी हाफिज सईदला मोस्ट वाँटेड दहशतवादी घोषित केल्यानंतर गेल्या वर्षी 17 जुलै रोजी त्याला अटक करण्यात आली होती. हाफिज सईदसह त्याचे दोन साथीदार जफर इकबाल आणि याह्या मुजाहिद या दोघांना 10 वर्ष सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर हाफिजचा नातेवाईक असलेल्या अब्दुल रहमान मक्की याला सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

संयुक्त राष्ट्रांनी यापूर्वीच हाफीज सईदला फरार दहशतवादी घोषित करुन त्याच्यावर एक कोटी डॉलर्सचे इनाम लावले होते. दहशतवाद्यांना पैसे पुरवल्याच्या दोन प्रकरणांत हाफिज सईदला गेल्या वर्षी 17 जुलै रोजी अटक करण्यात आली होती.

त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये त्याला 11 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. तेव्हापासून तो लाहोरच्या लखपत कारावासात बंदीवान आहे. या तुरुंगाभोवती कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!