---Advertisement---

कोल्हापुरचे अंबाबाई मंदिर २१ सप्टेंबरला दर्शनासाठी “या” कारणामुळे राहणार बंद

Follow Us:
---Advertisement---

कोल्हापुर : कोल्हापूर येथील अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाच्या तयारीसाठी लगबग सुरू आहे. अंबाबाई मंदिराच्या गाभाऱ्याची आणि दागिन्यांची स्वच्छता बुधवार २१ सप्टेंबर २०२२ होणार आहे. यामुळे अंबाबाई मंदिर बुधवार २१ सप्टेंबरला दर्शनासाठी बंद राहणार आहे.

अंबाबाईच्या सर्व दागिन्यांची तसेच मूर्तीवरील हिऱ्यांची बुधवार २१ सप्टेंबर २०२२ रोजी स्वच्छता केली जाईल. देवीचे नित्य आणि नैमित्तीक वापराचे दागिने वेगवेगळे आहेत. उत्सवमूर्तीचे अलंकार वेगळे आहेत. या अलंकारांची वर्षातून एकदा स्वच्छता केली जाते. मंदिर परिसराची स्वच्छता आणि रंगरंगोटी सुरू आहे. मंदिराच्या शिखरांची रंगरंगोटी आज रविवारपासून सुरू झाली आहे. स्वच्छतेचे काम झाल्यावर पुन्हा मूर्तीला अभिषेक करून सालंकृत पूजा केली जाईल.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!