---Advertisement---

सांगलीमध्ये भीषण अपघातात ७ ठार

By team
On: April 18, 2024 9:50 AM
Follow Us:
---Advertisement---

सांगली : वृत्तसंस्था

भरधाव क्रुझर पाठीमागून ट्रॅव्हलर्सवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातात क्रुझरमधील सातजण जागीच ठार झाले. सांगलीतील विजापूर-गुहागर महामार्गावर जांभुळवाडीनजीक (ता. कवठेमहांकाळ) येथे बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

हा अपघात इतका भीषण होता की, क्क्रु झरचा चक्काचूर झाल्यानंतर पेट घेतल्याने मदत कार्यात अडथळे आले. क्रु झरचे तोंड निम्मे ट्रॅव्हलर्समध्ये घुसले होते. घटनास्थळी हाडामासांचा चिखल तसेच रक्ताचा सडा पडला होता. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, जमखंडी (ता. बागलकोट, कर्नाटक) येथून क्रु झरमधून लग्नासाठी वऱ्हाड सावर्डे (ता. तासगाव, जि. सांगली) येथे निघाले होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!