---Advertisement---

नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा घेतला पदभार, पदभार स्विकारल्या नंतर मुख्यमंत्र्यांवर साधला निशाणा

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : भाजपचे नेते नारायण राणे यांनी आज केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री म्हणून पदभार स्वीकारला, नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा पदभार स्विकारल्या नंतर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ‘शुभेच्छा देण्याइतकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही’ अशी टिप्पणी नारायण राणे यांनी यावेळी केली.

महाराष्ट्रातील मंत्र्यांनी आपापल्या खात्याचा पदभार आज स्विकारला असून रावसाहेब दानवे यांचं खातं कालच्या मंत्रिमंडळ विस्तारात बदललं. त्यांनी आज रेल्वे राज्यमंत्री म्हणून कारभार स्वीकारला. तर नारायण राणे यांनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम विभागाची सूत्र हाती घेतली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. भारती पवार यांच्याकडे महत्त्वाच्या खात्यांची धुरा सोपवण्यात आली. आज सकाळी त्यांनी आरोग्य राज्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला.

देशाचा जीडीपी कसा वाढेल तसंच देशातील तरुणांना रोजगार प्राप्त होण्यासाठी काय करता येईल याचा मी विचार करेन, असं पदभार स्वीकारल्यानंतर नारायण राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगीतले. त्याबरोबर राणेंनी केंद्रात राज्याचा प्रतिनिधित्व करण्यासाठी आपल्याला मंत्रिमंडळात स्थान दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार देखील मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!