मुंबई : चित्रपट सृष्टीतील विश्वविख्यात कंपनी, कॅसेटकिंग गुलशन कुमार यांचे चिरंजीव टी सिरीजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका तीस 30 वर्षीय महिलेने त्यांच्या विरोधात अंधेरी येथील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्या महिलेला आपल्या कंपनीत काम देण्याच्या आमिषाने भूषण कुमार यांनी बलात्कार केल्याची तक्रार सदर महिलेने दिली आहे. सदर महिलेच्या तक्रारीनुसार पोलिसांनी भूषण कुमार यांच्या विरोधात आयपीसी 376, 420, 506 इत्यादी कलमांन्वये गुन्हे दाखल केली आहे.
भूषण कुमार हा आपल्याला गेल्या तीन वर्षे कसत होता व त्यांनी वेळोवेळी आपल्यावर बलात्कार केला आहे असेही त्या महिलेने सांगितले आहे. आपले व्हिडीओ व्हायरल करण्याचीही धमकी त्याने दिली आहे, असेही त्या महिलेने म्हंटले आहे.






