---Advertisement---

कर्नाटक भाजप प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार यांचा आडियो क्लिप व्हायरल, काय आहे? त्या क्लिपमध्ये वाचा सविस्तर

Follow Us:
---Advertisement---

बंगळुरू : कर्नाटक भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार यांचा एक आडियो क्लिप व्हायरल झाला आहे. त्यामुळे कर्नाटकच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

या फोन कॉलमध्ये नलीनकुमार यांनी मुख्यमंत्री यडीयुरप्पा मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणार आहेत, असे म्हंटले आहेत. या महिन्याच्या अखेरीस यडीयुरप्पा यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे असे विधान नलीनकुमार यांनी केली आहे.

मुख्यमंत्री यडीयुरप्पा हे मातब्बर नेते असून कर्नाटकात भाजप त्यांच्यामुळे वाढु शकले आहे. मुख्यमंत्री बी.एस. यडीयुरप्पा हे आपला कार्यकाळ निश्चित पूर्ण करतील अशी सारवासारव नळीलकुमार यांनी केले आहे.

या संदर्भात नलीनकुमार यांनी स्पष्टीकरण देताना म्हणाले की, तो आवाज माझा नाही, माझ्या आवाजात व्हायरल झालेली आडियो क्लिप खोटी आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी मी सरकारकडे करणार असल्याची त्यांनी सांगितले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!