---Advertisement---

डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद मुख्याध्यापक संघाच्या शहर सचिवपदी धनाजी मोरे,निवडीनिमित्त प्रशालेत सत्कार

Follow Us:
---Advertisement---

 

सोलापूर, दि.२९ : सोलापूर येथील लोकमान्य नूतन मराठी विद्यालय या शाळेचे मुख्याध्यापक धनाजी मोरे यांची डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद मुख्याध्यापक संघाच्या शहर सचिवपदी निवड करण्यात आली आहे.याबद्दल लोकमान्य शिक्षण प्रसारक मंडळ यांच्याकडून अध्यक्ष हरिसिंग लंगडेवाले यांच्या हस्ते व संस्थेचे सचिव मोहनसिंग फटफटवाले यांच्या अध्यक्षतेखाली शाळेत सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्लाप्पा फुलारी यांनी केले.यावेळी मोरे यांच्या कार्याचा गौरव इरया स्वामी व अर्चना नष्टे यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केला. सत्कारास उत्तर देताना मोरे यांनी मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून शिक्षक संस्था व शाळा यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन,असे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश पाटील यांनी तर आभार राजशेखर चितळी यांनी मानले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!