---Advertisement---

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र आलं आहे. या पत्रात किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकीचं पत्र आल्याने खळबळ उडाली आले आहे. हे पत्र कुणी पाठवले आहे याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे पत्र मुंबईबाहेरुन आलं असल्याचं बोललं जात आहे. तसेच हे पत्र मराठीत असल्याचीही माहिती समोर आली आहे.

गेल्या वर्षीही महापौर किशोरी पेडणेकर यांना फोनद्वारे धमकी आली होती. त्यावेळी सुद्धा धमकावणाऱ्याने किशोरी पेडणेकर यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. महापौर झाल्यापासून किशोरी पेडणेकरांना दुसऱ्यांदा धमकी आली आहे. पत्रात अश्लिल भाषेचा वापर करत महापौरांना शिविगाळ करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या पत्रात महापौरांच्या कुटुंबियांनाही गोळ्या घालुन मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!