---Advertisement---

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींची सोलापुरात जीभ घसरली; म्हणाले, शरद पवार हे प्रत्येकाच्या अंत्ययात्रेला जाऊन आलेत!

Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी काल सोलापूरात एका समारंभासाठी आले होते. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. टीका करताना अमोल मिटकरींचे जीभ घसरली अमोल मिटकरी म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे प्रत्येकाच्या अंत्ययात्रेला जाऊन आलेत येत्या काही दिवसांत गुजरातलाही जाऊन येतील अशी टीका केली. आता ही टीका त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे.

शरद पवार हे ‘मृत्युंजय वीर’ आहेत. अनेक लोकांनी पवार साहेबांना तब्यतेची काळजी घेण्यासाठी पत्र पाठवले. शरदराव, शरदबाबू असा उल्लेख पत्रांमध्ये होता. पण साहेब स्वतःची काळजी घेण्यासाठी सक्षम आहेत. शरद पवार हे प्रत्येकाच्या अंत्ययात्रेला जाऊन आले आहेत. काही दिवसात गुजरातलाही जाऊन येतील, असे म्हणत अमोल मिटकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!