ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स निर्देशांक १०० अंकांनी वधारला

मुंबई : शेअर बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात पुन्हा तेजी दिसून आली. शेअर बाजाराचा सेन्सेक्स निर्देशांक १०० अंकांनी वधारला होता. तर, निफ्टी निर्देशांकातही २० अंकानी वाढ झाली. बाजारात तेजी कायम राहिल्याने सेन्सेक्सने पुन्हा एकदा ६० हजार अंकाचा टप्पा ओलांडला. मात्र, काही वेळेनंतर निर्देशांक पुन्हा एकदा ६० हजारांच्या खाली आला.

सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स ५९,९१५ अंकावर होता. तर, निफ्टी निर्देशांक १७,८२५.५० अंकांवर ट्रेड करत होता. आज सकाळी बाजार सुरू झाला तेव्हा ४० अंकांची घसरण दिसून आली. तर, निफ्टी निर्देशांक ५ अंकांनी वधारला.

आशियाई शेअर बाजारात आणि मंगळवारी अमेरिकन शेअर बाजारात घसरण झाली होती. त्याच्या परिणामी भारतीय शेअर बाजार सुरू होताच किंचीत घसरण झाली. त्यानंतर काही वेळेतच बाजारात खरेदीचा कल वाढला.

या कंपनीचे शेयर तेजीत

बाजार सुरू होताच बँकिंग स्टॉकचे दर वधारले असल्याचे दिसून आले. बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या शेअरमध्ये वाढ झाली. त्याशिवाय, मारुती सुझुकीच्या शेअर दरात वाढ झाल्याचे दिसून आले. बँकिग शेअरसोबत ऑटो क्षेत्रातील शेअर दरात चांगली वाढ दिसून आली. मात्र, बाजारातील व्यवहाराच्या सुरुवातीच्या टप्प्यात स्मॉल कॅप, मिड कॅप, एफएमसीजी, एनर्जी, रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर दरात घसरण झाली.

दरम्यान, मंगळवारीदेखील शेअर बाजारात तेजी राहिली होती. मंगळवारी बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक ६७२.७१ अंकांनी वधारला होता. तर, निफ्टीमध्येही १७९.५५ अंकानी वाढ झाली होती. निफ्टी १७,८०५.२५ अंकावर बंद झाला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!