---Advertisement---

निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांमुळे भाजपचे वटवृक्षात रूपांतर : तानवडे ;सांगवी बुद्रुक येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट: कोण काहीही म्हणत असले तरी निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांमुळेच तालुक्यात आज वटवृक्षात रूपांतर झाले
आहे, ही वस्तुस्थिती आहे,असे मत वागदरी जिल्हा परिषद गटाचे सदस्य आनंद तानवडे यांनी व्यक्त केले. अक्कलकोट तालुक्यातील सांगली बुद्रुक येथे ३७ लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण त्यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.

पुढे बोलताना तानवडे म्हणाले,१९९५ च्या पूर्वीपासून स्वर्गीय आमदार बाबासाहेब
तानवडे यांनी भाजपचे मूळ रोप अक्कलकोट तालुक्यात रावले.त्यानंतर भाजप खऱ्या अर्थाने तालुक्यात वाढली.हे सर्व जेष्ठ नेते मंडळींना माहिती आहे. आजही तालुक्यात ते ज्येष्ठ नेते मंडळी भाजपमध्ये कार्यरत आहेत.त्यांच्यामुळे भाजपचे आज मोठ्या स्वरुपात रुपांतर झाले आहे.हे कोणीही नाकारू शकत नाही.आजही आम्ही भाजपचेच निष्ठावंत कार्यकर्ते असून भाजपमुळे आमच्या घराण्याचे नाव झाले आहे. ते नाव कोणी कमी करू शकत नाही आणि ते आम्ही या माध्यमातून टिकवून ठेऊ.आमच्याबद्दल अफवा आणि गैरसमज पसरवले जात आहेत पण जनता त्याला बळी पडणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना मेजर बाळासाहेब भोसले यांनी तानवडे यांनी गावासाठी ३७ लाख रुपये विकास निधी दिल्याबद्दल कृतज्ञता
व्यक्त करून तानवडे हे विकास करणारे नेते आहेत,त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे
उभे आहोत,असे सांगितले. अभिजित काळे यांनी तानवडे यांनी विविध योजनांच्या माध्यमातून मतदारसंघात कोट्यवधी
रुपयांचा निधी आणून या भागाचा कायापालट केल्याबद्दल कौतुक केले. पत्रकार दिनानिमित्त सांगवी बुद्रुक ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सदस्य गुंडप्पा पोमाजी, युवा नेते संजय भोसले, विष्णू भोसले,ज्येष्ठ नेते अबूबकर शेख, उपसरपंच लक्ष्मण डांगे, अंबादास डांगे,शंकर साबळे,इरफान शेख,ग्रामपंचायत सदस्य तहसीन शेख, वासंती सलबत्ते, रजिया कागदे, काजल राठोड, सुभाष सोनकांबळे, संभाजी खरात, मुमताज कागदे, ग्रामसेविका एस.पी पोमाजी, पोलीस पाटील प्रवीण बाबर यांच्यासह सांगवी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!