---Advertisement---

तोळणूर येथील ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रा कोरोनामुळे रद्द

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.१२ : मिनी सिद्धेश्वर यात्रा म्हणून ओळखली जाणारी अक्कलकोट तालुक्यातील तोळणूर येथील ग्रामदैवत श्री.सिद्धरामेश्वर यात्रा या वर्षीही कोरोनामुळे रद्द करण्यात आली आहे. निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच मानकरी, पुजारी, पंचकमिटी सदस्यांच्या उपस्थितीत सर्व धार्मिक विधिवत पूजा कार्यक्रम होणार असल्याची माहिती सिद्धरामेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष प्रकाश उणणद यांनी दिली.

सध्या कोरोना तिसरी लाट सुरू असून या पासून बचाव करण्यासाठी या वर्षीही यात्रा रद्द करण्यात आली आहे. फक्त धार्मिक विधीवत पूजा शासनाच्या नियमानुसार घालून दिलेले नियम व अटी पाळत मोजक्याच भक्तांच्या उपस्थितीमध्ये साधेपणाने पूजा
विधी पार पडणार आहे. सोलापूर सिद्धरामेश्वर यात्रे प्रमाणे तोळणूर यात्रेत तैलाभिषेक, नंदीध्वज मिरवणूक, अक्षता सोहळा, होम आदी धार्मिक कार्य मोजक्याच मानकरी आणि पंचकमिटीचे निवडक भक्तांच्या उपस्थितीत पार पडणार असून सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!