---Advertisement---

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा; काँग्रेसमध्ये पडले दोन गट, माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांनी गुलाम नबी आझाद यांचा नाव घेता केली टिका

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. पद्म पुरस्कार ज्या व्यक्तींना दिले जाणार आहेत, त्यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांचाही समावेश आहे. त्यांचा पद्म पुरस्काराने सन्मान केला जाणार असल्याने काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. एका गटाने आझाद यांचे कौतुक केले आहे तर दुसऱ्या गटाने नाक मुरडत त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे.

टीका करणाऱ्यांमध्ये माजी केंद्रीयमंत्री जयराम रमेश यांचेही नाव सामील आहे. त्यांनी नाव न घेता आझाद यांच्यावर टीका केली आहे. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांनाही पद्म पुरस्काराने गौरविण्यात येणार होते, मात्र त्यांनी हा सन्मान स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यांचं हे उदाहरण देत रमेश यांनी एक टि्वट केलं आहे, ज्यात त्यांनी म्हटलंय की “योग्य निर्णय घेतला, ते आझाद राहू इच्छितात; गुलाम नाही”

रमेश यांनी जरी टीका केली असली तरी काँग्रेस नेते शशी थरूर यांनी मात्र गुलाम नबी आझाद यांचं पद्म पुरस्काराने सन्मानित होत असल्या बद्दल अभिनंदन केलं. त्यांनीही एका ट्विटद्वारे त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

थरूर यांनी म्हटलंय की, “सार्वजनिक आयुष्यातील योगदाना बद्दल दुसऱ्या पक्षाच्या सरकारकडून सन्मानित होणं ही चांगली बाब आहे.” अभि नेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज बब्बर यांनीही आझाद यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्ही मला मोठ्या भावा प्रमाणे असून तुमचे जीवन हे प्रेरणादायी आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

पद्म पुरस्कारांची घोषणा झाल्या नंतर कोणी तरी अफवा पसरवली होती की गुलाम नबी आझाद यांनी त्यांच्या ट्विटर प्रोफाईलमधून काँग्रेस पक्षामध्ये आमूलाग्र व्हावा अशी आग्रही मागणी करणारा एक गट तयार झाला असून याला जी -23 गट असं म्हटलं जातं. गुलाम नबी आझाद हे या गटातील प्रमुख नाव आहे.

यामुळे गांधी कुटुंबाशी एकनिष्ठ असणाऱ्यांच्या ते सातत्याने निशाण्यवर असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेकदा जाहीररित्या आझाद यांची तारीफ केली आहे. ही बाब देखील काँग्रेसमधल्या काहींना खटकते आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!