---Advertisement---

अक्कलकोटच्या तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शंकर म्हेत्रे यांची फेरनिवड; काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

Follow Us:
---Advertisement---

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.२७ : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचा विस्तार केला असून अक्कलकोट तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी शंकरराव म्हेत्रे यांची तिसर्‍यांदा निवड करण्यात आली आहे. मंगळवारी,याबाबतीत अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले. पक्षसंघटन व पक्षाचे विचार सर्वसामान्यांपर्यंत प्रभावीपणे पोचविण्यासाठी म्हेत्रे यांची नियुक्ती केल्याचे मोहिते-पाटील यांनी सांगितले.

अक्कलकोट तालुक्यासह शेजारील कर्नाटक राज्यातदेखील म्हेत्रे यांच्या कार्याचा ठसा आहे. गोरगरिबांच्या अडी-अडचणी, भांडण तंटे मिटविण्यात व दानधर्म करण्यात स्व. सातलिंगप्पा म्हेत्रे यांचा वारसा अविरतपणे त्यांनी जपला आहे. तरूण वर्गात म्हेत्रे यांची क्रेझ असून त्यांच्या निवडीचे वृत्त कळताच दुधनीसह संपूर्ण तालुक्यात एकच जल्लोष करण्यात आला.

यापुढील काळात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अविरतपणे जनसेवा करणार असल्याचे नुतन तालुकाध्यक्ष म्हेत्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तर आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती,नगरपालिका निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत यश संपादन करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडीबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह तालुक्यातील नेते मंडळींनी अभिनंदन केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!