---Advertisement---

रासप पदाधिकार्‍यांच्यावतीने मोटार सायकलवर राष्ट्रीय समाज पक्षाच्या प्रचार व प्रसाराला सुरुवात – दाजी कोळेकर

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट  : राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माजी मंत्री राष्ट्रनायक महादेवजी जानकर आणि पक्षाचे चिन्ह मोटारसायकलवर रेडीयम करून राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रचार व प्रसार व्हावा. पक्षाचे संघटनात्मक विस्तार व्हावे आणि आगामी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती तसेच अक्कलकोट, मैंदर्गी व दुधनी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाची विचारधारा व पक्षाचे ध्येय धोरण तालुक्यातील प्रत्येक सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही अक्कलकोटच्या रासप पदाधिकाऱ्यांनी हा एक छोटासा प्रयत्न करीत असल्याचे मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष दाजी कोळेकर यांनी सांगितले.

मुळात मोटारसायकल वरती जानकर साहेबांचा फोटो व पक्षाचे चिन्ह रेडीयम करण्याची संकल्पना आमचे रासपचे जिल्हा प्रसिद्ध प्रमुख दत्ता भाऊ माडकर यांची होती. आणि तालुक्यातील माझ्या सहित आणखी काही पदाधिकाऱ्यांनी ही दत्ता भाऊंच्या संकल्पनेला सहमती दर्शवली. आणि त्वरित आठ गाड्यावरती फोटो व रेडीयम करुन सुरुवात केली आहे. आम्ही तालुक्यात किमान पन्नास मोटारसायकलवरती जानकर साहेब यांचे फोटो व पक्षाचे चिन्ह रेडीयम करण्याचा संकल्प केला आहे.

या अनुषंगाने तालुक्यातील मोटारसायकलवर डिजिटल फोटो व रेडीयम जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दत्तात्रय माडकर, तालुका उपाध्यक्ष तिप्पणा घोडके, तालुका प्रसिद्धी प्रमुख संतोष शिंदे, तालुका युवक अध्यक्ष दाजी कोळेकर, तालुका उपाध्यक्ष पिंटू गावडे, विधानसभा संपर्क प्रमुख शिवानंद गाडेकर, धनराज शिंगाडे , राजू माडकर आदींनी करुन घेतली आहे. येणाऱ्या काळात दत्तात्रय माडकर यांच्या सोबत राहून आम्ही सर्व पदाधिकारी तालुक्यातील आणखी जेवढे शक्य होईल तितक्या मोटारसायकलची संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करू आणि पक्षाच्या संघटन वाढीसाठी अक्कलकोट टिम नेहमी कटिबद्ध आहे आणि राहणार असल्याची माहिती रासपचे युवक आघाडीचे तालुका अध्यक्ष दाजी कोळेकर यांनी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!