ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बार्शीतील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणे थांबवा, अन्यथा आंदोलन !

 

सचिन पवार

बार्शी, दि.२३: कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी आधीच अडचणीत सापडला आहे. पिकाला भाव मिळत नाही आणि अशातच वर्षभर कष्ट केलेले पीक काढणीला आले असता महावितरण कंपनीचे कर्मचारी वीज कनेक्शन तोडत आहे. त्यामुळे पीक कसे जगवायचे, कसे उत्पादन घ्यायचे असा प्रश्न आता शेतकर्‍यांना पडला आहे. अशाप्रकारे वीज कनेक्शन तोडणे म्हणजे सुलतानशाही चे सरकार आहे का असा प्रश्न आता शेतकऱ्यांमधून विचारला जातोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन वीज कनेक्शन तोडणे त्वरित थांबावे असे निवेदन भारतीय किसान संघाद्वारे नायब तहसीलदार बी आर. माळी यांना दिले आहे. वीज कनेक्शन तोडणे हा यावरचा उपाय नसून योग्य मार्ग काढत शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन तोडणे त्वरित थांबवावे आणि लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एक याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वीज कनेक्शन तोडणे थांबावावे. निवेदन देताना भारतीय किसान संघ बार्शीचे कार्यकर्ते अशोक उपळकर,अशोक सावतामाळी,नामदेव माळी,चंद्रकांत ढाके, शास्त्रभूल ढाके आदी उपस्थित होते.

शेतकऱ्यांकडून
लूट

गावोगावी जाऊन प्रत्येक शेतकऱ्याकडून महावितरण सक्तीची वसुली करत आहे. त्यामुळे अशाप्रकारे वीजबिल तोडणे त्वरित थांबावे. अन्यथा सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही आंदोलन करू.

शुभम शिलवंत- अध्यक्ष भारतीय किसान संघ बार्शी

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!