---Advertisement---

अक्कलकोट तालुक्यात आगामी निवडणुकीत रिपाईचा प्रभाव दिसेल : अविनाश मडीखांबे; बणजगोळ येथे शाखा उद्घाटन

Follow Us:
---Advertisement---

 

अक्कलकोट (प्रतिनिधी) :- अक्कलकोट तालुक्यातील आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीत रिपाईचा चांगला प्रभाव दिसेल,असे मत तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी व्यक्त केले.अक्कलकोट तालुक्यातील बणजगोळ येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या शाखेचे उद्घाटन तालुकाध्यक्ष अविनाश मडिखांबे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मडिखांबे यांनी म्हणाले की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले आणि रिपाइं महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सरवदे यांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या नगरपरिषद,पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत रिपाईंचा झेंडा फडकवण्यासाठी रिपाइंच्या माध्यमातून आपण केलेल्या कामाचे माहिती प्रत्येक घरोघरी पर्यंत पोचवावे व कार्यकर्त्यांनी येणाऱ्या निवडणूक साठी जोमाने कामाला लागावे,असे आवाहन तालुका अध्यक्ष मडिखांबे यांनी केले.

 

यावेळी रिपाइं युवक तालुका अध्यक्ष अप्पा भालेराव,रिपाइं तालुका सचिव राजू भगळे, युवक तालुका सचिव इराणाा धसाडे,रिपाइं शहर उपाध्यक्ष शुभम मडिखांबे,सुरेश गायकवाड, रिपाइं शहर संघटक अंबादास शिंगे,सुरेश सोनकांबळे,तमा धसाडे,श्रीशेल इसमांत्री,प्रशांत गायकवाड,शाखा अध्यक्ष कट्याप्पा मन्नुरे,शाखा उपाध्यक्ष महादेव बनसोडे, शाखा सचिव शरणू बनसोडे,कार्याध्यक्ष नारायण मन्नुरे,अरुण मन्नुरे, गोरख बनसोडे,बुजांग निकांबे सोनेराव बनसोडे,भागवत बनसोडे,गौतम गायकवाड,राजेंद्र मुळे,कृष्ण मन्नुरे,स्वामीनाथ मन्नुरे, बाबासाहेब मन्नुरे,नागेश बनसोडे, भीमा गायकवाड,संगमेश बनसोडे,धुळाप्पा बनसोडे, शिवाजी बनसोडे,मल्लु माने, सतिश मुळे,प्रेमनाथ बनसोडे, दौलत माने,रमेश मुळे,सैपन पत्रे, आदी पदाधिकारी कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!