---Advertisement---

श्री महात्मा बसवेश्वर विचार मंच सोलापूरचे जिल्हास्तरीय ‘बसवरत्न’ पुरस्कार जाहीर, पत्रकार मारुती बावडे यांच्यासह अकरा जणांचा समावेश

Follow Us:
---Advertisement---

प्रतिनिधी

सोलापूर,दि.७ : राज्याचे माजी
गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त महात्मा बसवेश्वर विचार मंच,सोलापूर यांच्यावतीने बसवेश्वर जयंतीचे औचित्य साधून ‘बसवरत्न’ पुरस्कार ( जिल्हास्तरीय ) पुरस्कार जाहीर झाले आहेत. या पुरस्करांची घोषणा महात्मा बसवेश्वर विचार मंचचे जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी केली.यात जिल्ह्यातील बारा जणांचा समावेश आहे.यावेळी कार्याध्यक्ष राजू जाधव, सचिव राजशेखर नागणसुरे, अशोक भांजे, सदस्य जहांगीर शेख, चंद्रकांत सपळे, नितीन कुलकर्णी, काशिनाथ जंगलगी आदी उपस्थित होते.पुरस्काराचे मानकरी खालीलप्रमाणे-श्री.पुरुषोत्तम बलदवा,सोलापूर ( जीवन गौरव पुरस्कार ),
श्री. सुदीप दादा चाकोते ( आदर्श समाजसेवक),श्री.लक्ष्मण नागणे,मंगळवेढा ( जीवन गौरव पुरस्कार ),श्रीमती अंजली सिरशी (आदर्श शिक्षिका पुरस्कार ),श्री.योगेश कबाडे,अक्कलकोट (आदर्श शिक्षक पुरस्कार),श्री. मारुती बावडे,अक्कलकोट (आदर्श पत्रकारिता पुरस्कार ),फिरदोस पटेल,सोलापूर (आदर्श समाजसेविका पुरस्कार ),श्रीम.सुरेखा महादेव सुरवसे ( आदर्श माता पुरस्कार), श्री.तिपण्णा कामण्णा कोळी,द. सोलापूर (आदर्श शिक्षक पुरस्कार ),श्री.स्वामीराव कृष्णात शिंदे,सोलापूर (आदर्श समाजसेवक पुरस्कार ),श्री.पशुपती माशाळ(आदर्श उद्योगपती पुरस्कार ),श्री.रमेश बसूदे पाटील (आदर्श शिक्षक पुरस्कार ) यांचा यात समावेश आहे. पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ असे असून देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी विधान परिषद सदस्य रामहरी रुपनवर यांच्या उपस्थितीत लवकरच पुरस्काराचे वितरण होणार आहे,असे संघटनेच्यावतीने कळविण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!