---Advertisement---

हन्नुर सोसायटीच्या चेअरमनपदी विश्वनाथ भरमशेट्टी यांची निवड,व्हाईस चेअरमनपदी अनिल बिडवे

Follow Us:
---Advertisement---

 

सचिन पवार

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी विश्वनाथ भरमशेट्टी यांची तर व्हाईस चेअरमनपदी अनिल बिडवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीनंतर हन्नुर ग्रामस्थांनी नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला.आजतागायत हन्नुरची सोसायटीची निवडणूक बिनविरोध
होत आली आहे. यावेळीही भरमशेट्टी आणि कल्याणशेट्टी गटाने ही निवडणूक बिनविरोध केली होती.नुतन संचालक म्हणून ईरण्णा सुतार,चंद्रकांत हेगडे, भारत जंगले,वैशाली भरमशेट्टी, भूजंगा ईरवाडकर,तिपण्णा घोडके, ईरण्णा पारतनाळे,ईरण्णा कल्याणशेट्टी,विश्वनाथ पारतनाळे, बंदेनवाज जमादार,शरणप्पा विभुते आदींची बिनविरोध निवड झाली आहे.निवडीनंतर गावातील मुख्य मार्गावरून जल्लोष करण्यात आला.यावेळी बोलताना नुतन चेअरमन भरमशेट्टी यांनी आगामी कार्यकाळात शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविणार असल्याचे सांगितले.तसेच शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.यावेळी राजकुमार भरमशेट्टी,माजी सरपंच बसवणा सुतार,सेक्रेटरी विश्वनाथ भोसले,अप्पाशा हताळे,चंद्रकांत जंगले गुरूजी,नरेंद्र जंगले,निलप्पा घोडके,सोपान निकते, निरंजन हेगडे,सुरेश हेगडे,तिपण्णा हेगडे,माजी चेअरमन योगीराज भरमशेट्टी,विठ्ठल भरमशेट्टी,मलप्पा भरमशेट्टी,शैलेश पाटील,रमेश छत्रे,सिध्दप्पा पुजारी आदी उपस्थित होते. चपळगावचे कलप्पा तडवळकर, नितिन वाले,नन्हेगावचे गोटु मंगरूळे,श्रीशैल पाटील यांच्यासह पंचक्रोशीतील विविध पदाधिकाऱ्यांनी
चेअरमन भरमशेट्टी यांचा सत्कार केला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. जे. धडस यांनी काम पाहिले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!