---Advertisement---

भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक आघाडी अक्कलकोट शहर अध्यक्ष फैजअहमद उर्फ नन्नू कोरबू यांची बी. एस. एन. एल. सदस्य पदी नियुक्ती..

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक आघाडी अक्कलकोट शहर अध्यक्ष फैजअहमद ऊर्फ नन्नू कोरबू यांची बी. एस. एन. एल. च्या सदस्य पदी निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सोलापूर जिल्ह्यातील मान्यवर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत.

नवी दिल्लीच्या दुरसंचार भवन येथून फैजअहमद उर्फ नन्नू कोरबू यांच्या विशेष नियुक्ती बाबतचा आदेश प्राप्त झाला आहे. खासदार डॉ. जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी व अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी कोरबू यांच्या नावाची शिफारस केली होती. भारतीय जनता पक्षाचे अल्पसंख्याक आघाडी अक्कलकोट शहर अध्यक्ष फैजअहमद उर्फ नन्नू कोरबू यांचे सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना सोलापूर भारतीय दुरसंचार निगमच्या जिल्हा सदस्यपदी पुढील दोन वर्षासाठी निवड करण्यात आली आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल खासदार डॉ. जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, अक्कलकोट तालुक्याचे आमदार सचिन कल्याणशेट्टी,रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, अक्कलकोट नगरपरिषदेचे नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सुनील बंडगर, रिपाइंचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मडिखांबे, राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष दत्तात्रय माडकर, भाजपचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष मोतीराम राठोड, श्री स्वामी समर्थ देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या सह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी कोरबू यांच्या वर शुभेच्छांचा वर्षाव सुरु केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!