---Advertisement---

विशेष पॅकेजचे साहित्य वाटप करा अन्यथा रिपाइंतर्फे फटाके फोडो आंदोलन 

Follow Us:
---Advertisement---

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट,दि.२१ : तालुक्यातील सर्व नागरीकांना दिवाळी पूर्वी शासनाने नव्याने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजचे साहित्य लवकरात लवकर दोन दिवसात वाटप करण्यात यावे, अन्यथा रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) वतीने तहसीलदार कार्यालय समोर फटाके फोडो आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. तहसील कार्यालय येथे नायब तहसीलदार विकास पवार यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की कोरोनामुळे पडलेले लाकडाउन व यावर्षी सतत पडणाऱ्या पावसामुळे पडलेल्या ओला दुष्काळामुळे सर्व सामान्य माणसाला व गोर गरीब लोकांना हवे तसे

काम धंदा नसल्याने पैशाची अडचण निर्माण झाली आहे. शासनाने नवी पॅकेज जाहीर केल्याने गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील नागरीकांना दिलासा मिळाला आहे परंतु ते लवकर तरी ते मिळावे.जर लवकर विशेष पॅकेजच्या साहित्य न मिळाल्यास अक्कलकोट रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) च्या वतीने तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे यांनी दिला आहे.

यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सोपान गायकवाड, जिल्हा चिटणीस सैदप्पा झळकी, कार्याध्यक्ष विजय पोतेनवरु, अंबादास गायकवाड, दिलिप माळी, मुस्लिम आघाडी शहर अध्यक्ष सैपन शेख, शहर सरचिटणीस शुभम मडिखांबे, राजु वाघमारे,चंद्रकांत गायकवाड, शिरवळ शाखा अध्यक्ष उत्तम गायकवाड,सुरेश सोनकांबळे, विजय राठोड आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!