---Advertisement---

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येणार सांगोला दौऱ्यावर,आमदार शहाजी पाटलांनी दिली “ही” प्रतिक्रिया

Follow Us:
---Advertisement---

सांगोला : आगामी निवडणुकीत बंडखोर आमदारांना पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाबाबत सौम्य भूमिका घेणारे शिंदे गटातील नेते आता आक्रमक झाले आहेत. दोन्ही गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढील महिन्यात सांगोला मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यावरून सांगोला मतदारसंघाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंच्या सांगोला दौऱ्यामुळे काहीही फरक पडणार नाही, असं विधान शहाजीबापू पाटलांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे यांनी सांगोला दौरा केल्यास मतदारसंघात काही फरक पडेल का? असं विचारलं असता शहाजीबापू पाटील म्हणाले की, “माझ्या मतदारसंघात अहंकार आणि गर्व नाही. पण माझ्या मतदारसंघात कुणाच्या येण्याने काहीही फरक पडणार नाही.” हा मतदारसंघ गेल्या ४० वर्षांपासून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख आणि माझ्यात विभागला आहे. येथील घरांघरात आमची नाती, आमच्या भाव-भावना, आमची सुखं-दु:खं जनतेशी एकवटली आहेत. या मतदारसंघाची परंपरा पुन्हा एकदा देशमुख घराणं विरुद्ध शहाजीबापू पाटील अशीच कायम राहील, अशी प्रतिक्रिया शहाजीबापू पाटील यांनी दिली.

“उद्धव ठाकरे यापूर्वी दोनवेळा माझ्या मतदारसंघात आले आहेत. आताही ते माझ्या मतदारसंघात येत असतील तर त्याबाबत नाराज होण्याचं काहीही कारण नाही. परंतु मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहे. त्यांचा दौरा लवकरच निश्चित होईल असे शहाजी बापू पाटील म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!