---Advertisement---

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्योगपति गौतम अदानी यांच्यात रात्री उशिरा बैठक, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रसिद्ध उद्योगपति गौतम अदानी यांच्यात रात्री उशिरा दीड तास बैठक झाली. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वर्षा या निवासस्थानी ही बैठक पार पडली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंतदेखील उपस्थित होते. राज्याच्या विकासाबद्दल सकारात्मक अशी चर्चा बैठकीत झाली असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितल.

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले की, गौतम अदानी हे फक्त राज्यातलेच नव्हे तर देशातले मोठे उद्योगपती आहेत राज्याच्या विकासाबद्दल सकारात्मक चर्चा त्यांच्यासोबत झाली. गेल्या अडीच वर्षांच्या सरकारच्या काळातच हे सगळे प्रकल्प राज्याच्या बाहेर गेले आहेत. विरोधकांकडून उगाचच बदनामी केली जात आहे असंही सामंत यांनी म्हणाले.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!