---Advertisement---

राहुल गांधीना अटक करा, सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांची मागणी

Follow Us:
---Advertisement---

मुंबई : राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य केल्या प्रकरणी सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे दादर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहेत. कांग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्याने आता राजकीय वाद सुरू झाला आहे. भारत जोडो यात्रेवेळी राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत चुकीचं विधान केलं होतं.

सावरकर हे अंदमानच्या तुरुंगात दोन तीन वर्षे राहिल्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. तसंच सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहून आपण किती शूरवीर होतो ते सांगितलं. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची आणि त्यांच्यासाठी ते काँग्रेसविरोधात काम करायचे असं राहुल गांधी म्हणाले होते.

राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत चुकीचं वक्तव्य केल्या प्रकरणी सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे दादर पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करणार आहेत. यावेळी रणजीत सावरकर यांच्यासोबत शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळेसुद्धा असणार आहेत अशी माहिती रणजीत सावरकर यांनी दिली आहे

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!