---Advertisement---

अजित पवार यांच्या वक्तव्याचा अक्कलकोट भाजपच्यावतीने निषेध

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.३ : नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याचा अक्कलकोट तालुका भारतीय जनता पक्षाच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर स्वराज्य रक्षक होते, असे वादग्रस्त वक्तव्य पवार यांनी केले होते. त्याचा निषेध ठिकठिकाणी होताना दिसत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीसह अजित पवार यांना सत्ताधाऱ्यांनी धारेवर धरले आहे. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरही होते आणि स्वराज्य रक्षकही होते. त्यामुळे पवार यांचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत, असे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.या  पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातही अजित पवार यांचा वक्तव्याचा निषेध करण्यात आला.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, शहराध्यक्ष शिवशरण जोजन, माजी उपनगराध्यक्ष यशवंत धोंगडे, पक्षनेते महेश हिंडोळे, महिला आघाडीच्या अध्यक्ष सुरेखा होळीकट्टी, आप्पासाहेब पाटील, ज्येष्ठ नेते प्रभाकर मजगे, ननु कोरबू,राहुल काळे, शिवशरण स्वामी आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!