---Advertisement---

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे सत्कार

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धार्मिकतेचा वसा, विकासाचा ठसा, प्रगतीचा आरसा न्यासाच्या माध्यमातून पाहायला मिळत असल्याचे मनोगत राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. संजय राठोड यांनी व्यक्त केले.

ते श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळात सहकुटुंब आले असता मंडळाचे सचिव शामराव मोरे व खजिनदार लाला राठोड यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

ना.संजय राठोड यांच्या समवेत शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा प्रमुख मनीष काळजे, भाजपा तालुकाध्यक्ष मोतीराम राठोड, बंटी राठोड, पंडित राठोड, रमेश राठोड व उत्तर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जितेंद्र कोळी हे उपस्थित होते.

यावेळी मंडळाचे मुख्य पुरोहित अप्पू पुजारी, सिद्धाराम कल्याणी, एस.के.स्वामी, बाळू पोळ, शहाजीबापू यादव, सतीश महिंद्रकर, धानू उमदी, बाळासाहेब घाडगे, दत्ता माने, राजू पवार, प्रसाद हुल्ले, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!