---Advertisement---

सुशीलकुमार शिंदे यांनी दिले शहाजी वाचनालयास पुस्तक भेट

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या जीवनावरील प्रकाशित झालेली पुस्तके अक्कलकोट येथील श्रीमंत शहाजीराजे भोसले शतकोत्तर वाचनालयास भेट म्हणून दिली. ही पुस्तके त्यांच्या सोलापूर येथील ‘ जनवात्सल्य ‘ या निवासस्थानी संस्थेच्या अध्यक्षा शैलशिल्पा जाधव यांना दिली.

ही पुस्तके शिंदे यांच्या संघर्षमय जीवनावर नामवंत साहित्यिकांनी लिहीलेली आहेत. यामध्ये सुशीलकुमार एक प्रवास, मी सुशीलकुमार शिंदे बोलतोय, सुशीलकुमार, सुशील स्नेहबंध, कामगार बस्तीसे संसद भवन तक, शिखर की ओर, सागा ऑफ ए स्ट्रगल, सुशीलकुमार शिंदे ए चाईल्ड ऑफ डेस्टनी अशा विविध भाषांमधील पुस्तकांचा या संचामघ्ये समावेश आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!