---Advertisement---

आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडुन तानवडे परिवाराचे सांत्वन

Follow Us:
---Advertisement---

 

 

अक्कलकोट, दि.१६ : भाजपाचे ज्येष्ठ नेते दत्ता तानवडे यांच्या निधनानिमित्त भारतीय जनता पक्षाचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी तानवडे कुटुंबीयांची भेट घेऊन परिवाराचे सांत्वन केले.यावेळी बोलताना त्यांच्याविषयीच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.जनसेवक स्व.आमदार बाबासाहेब तानवडे यांच्या
वेळी प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या खांद्याला
खांदा लावून भाजपा पक्ष वाढीसाठी प्रचंड कष्ट केले. प्रत्येक गाव, वाड्यावस्त्यावर भाजपाचे कार्यकर्ते तयार केले.आमदार बाबासाहेब तानवडे यांच्या निधनानंतर अक्कलकोट तालुका भाजपाची धुरा समर्थपणे सांभाळुन पक्षाची सेवा आणि कार्यकर्त्याना न्याय देण्यासाठी सदैव अग्रेसर राहिले.सन २००३ सालच्या सोलापूर लोकसभा पोटनिवडणूक स्व.प्रतापसिंह मोहिते – पाटील यांचे निवडणूक प्रमुख तेच होते. त्यावेळी दत्ताआण्णाचा सहवास मला लाभला.त्यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष बलभीमभाऊ शिंदे होते. त्यावेळी मला दत्ताआण्णाचे
काम अत्यंत जवळुन पाहण्याचा योग आला.पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिक पणे हाताळली. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा भाजप प्रवेश आणि विधानसभेची उमेदवारी यामध्ये महत्वाची भुमिका दत्ताआण्णानी पार पाडली होती.लोकसभा, विधानसभा आणि प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत भाजपासाठी जिवाचे रान केले,अशा अनेक आठवणींना त्यांनी यावेळी उजाळा दिला.या वेळी त्यांच्या समवेत माळशिरसचे भाजप नेते के.के पाटील,श्रीमती निर्मला तानवडे, विजय तानवडे,आनंद तानवडे, प्रशांत तानवडे, प्रवीण तानवडे, रेवणसिध्द बिराजदार आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!