---Advertisement---

ब्रेकिंग.. उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का ; एकनाथ शिंदेना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मोठा दिलासा, ‘’धनुष्य बाण’’ शिंदेकडे

Follow Us:
---Advertisement---

दिल्ली : बंडखोरी करून पक्षातून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने आज मोठा दिलासा दिला आहे. शिवसेना या नावासह धनुष्यबाण हे चिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांना दिले आहे. हा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगाचा हा निर्णय घटनाविरोधी असल्याची प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

‘हा बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे’ अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेत मविआ सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमचीच आहे असा दावा केला, तर उद्धव ठाकरेंनीही शिवसेना आमचीच आहे असा दावा केला आहे. दोन्ही नेत्यांकडून शिवसेनेसह धनुष्यबाणावर दावा करण्यात आल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले. मात्र, सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे सोपवले. त्यावर आयोगाने आज निर्णय दिला. त्यात निवडणूक आयोगाने धनुष्यबाणासह शिवसेना एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!