---Advertisement---

शितल म्हेत्रे याचं कार्य बघता तालुक्यात काँग्रेसला पुन्हा उभारी मिळेल ; काँग्रेस महिला प्रदेश अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे

Follow Us:
---Advertisement---

कुरनूर : अक्कलकोट महिला काँग्रेसचे अध्यक्ष युवा नेत्या शितल म्हेत्रे यांचा तालुक्यात काम बघता अतिशय कौतुकास्पद आहे. कारण अल्पकालावधीत राजकारणात एन्ट्री केल्यानंतर त्यांनी सुवर्णा लक्ष्मी फाउंडेशनच्या माध्यमातून महिलांसाठी धडपड असेल किंवा महिला सक्षमीकरण भर देत असलेली योजना असेल या सर्व बाबी लक्षात घेता आगामी काळामध्ये काँग्रेसला यश नक्कीच आहे. शितल म्हेत्रे यांच्या सारख्या कार्यकर्त्यांची काँग्रेस पक्षाला गरज आहे. जेणेकरून काँग्रेस पक्षाला दिशा मिळेल आणि खरोखरच म्हेत्रे यांचं कार्य हे तरुणांना महिला वर्गांना आकर्षित करण्यासारखे कार्य आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे यांनी केले.

युवा नेत्या शितल म्हेत्रे यांनी महाराष्ट्र महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा सव्वालाखे यांची भेट घेऊन त्यांच्या सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना त्यावेळी सव्वालाखे बोलत होत्या. ते दोन दिवसाच्या सोलापूर दौ-यावर होत्या सव्वालाखे यांनी या दौऱ्यादरम्यान मोहोळ, सोलापूर या ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी अक्कलकोट मतदार संघातील कार्याविषयी चर्चा करण्यात आली सव्वालाखे यांनी काँग्रेस भवन सोलापूर याठिकाणी महिलांना मार्गदर्शन केले.

स्वातंत्र्यप्राप्ती पासून काँग्रेस पक्षाने केलेल कार्य तळागाळापर्यंत पोहोचवा –

शासकीय विश्रामगृह सोलापूर येथे झालेल्या बैठकीत महिला काँग्रेस संघटन बांधणी, महिला मेळावे, काँग्रेसचे ध्येय धोरण स्वातंत्र्य प्राप्तीपासून आजपर्यंत काँग्रेस पक्षांनी केलेले कामाची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्याचे कार्य सर्वांनी प्रामाणिकपणे केले पाहिजे – काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा संध्याताई सव्वालाखे

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!