---Advertisement---

तरुणीवर अत्याचार, गर्भवती अन लग्नास नकार !

By team
On: November 24, 2023 3:01 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात अल्पवयीन मुलीसह तरुणीना अनेक आमिष देत अत्याचाराच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना अशीच एक धक्कादायक घटना पुणे शहरातील कोंढवा पोलीस स्थानकाच्या हद्दीत घडली आहे. लग्नाचे आमिषाने तरुणीवर अत्याचार करीत गर्भवती राहिल्यानंतर लग्नास नकार दिला. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी 2023 ते 19 एप्रिल 2023 या कालावधीत कोंढवा बु. आणि हडपसर येथे वारंवार घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोंढवा बुद्रुक येथे राहणाऱ्या 33 वर्षीय तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि.23) फिर्याद दिली आहे. यावरुन जमील इसाक मनियार (वय-37 रा. गुलटेकडी, पुणे) याच्यावर आयपीसी 376/2/एन नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने फिर्यादी तरुणीच्या घरी येऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच तिच्या नकळत तिचे न्युड फोटो मोबाईलमध्ये काढले. यानंतर तिला लग्नाचे आमिष दाखवून कोंढवा बु. आणि हडपसर येथे नेऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. यातून तरुणी 7 आठवड्याची गर्भवती राहिली. मात्र, यानंतर आरोपी जमील याने लग्न करण्यास नकार दिल्याचे फिर्य़ादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!