---Advertisement---

बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर आग : दुर्देवाने दोघांचा मृत्यू !

By team
On: November 25, 2023 4:13 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

शनिवारी पहाटेच्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर येथील वाघबीळ भागात एका बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर आग लागली. या आगीमुळे बंगल्यात अडकले होते तर, तीन जण घराबाहेर पडलेले. अग्निशमन दलाच्या जवानांनी बंगल्यात अडकलेल्या दोघांना बाहेर काढले पण, रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. यात अभिमन्यू मढवी (६०), रमाबाई मढवी ( ५५ ), अशी मृतांची नावे आहेत तर, प्रणाली मढवी (३० ), कविश मढवी (१३) , पलाश मढवी ( १२) अशी जखमींची नावे आहेत. हे सर्वजण घोडबंदर येथील वाघबीळ भागातील हिरानंदानी इस्टेट रोड परिसरातील मढवी निवास या तळ अधिक २ मजली बंगल्यात राहतात. शनिवारी पहाटे ३.२० वाजता या बंगल्याच्या पहिल्या मजल्यावर आग लागली.

या घटनेची माहिती मिळताच मुख्य अग्निशमन अधिकारी, कासारवडवली पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी बचावकार्य सुरू केले. आगीमुळे पाचही जण बंगल्यात अडकल्या होत्या. त्यातील प्रणाली, कविश मढवी , पलाश हे स्वतःहून बाहेर पडले. तर अभिमन्यू आणि रमाबाई या दोन व्यक्ती दुसऱ्या मजल्यावर अडकल्या होत्या. त्यांना आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या कर्मचाऱ्यांकडून तसेच अग्निशमन दलाच्या जवानांकडून बाहेर काढण्यात आले. बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्यांना हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे या दोन्हीही व्यक्ती मृत झाल्याचे हिरानंदानी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे समजू शकलेले नाही, अशी माहिती ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!