---Advertisement---

सोलापूर राज्य उत्पादन विभागाची कारवाई : हातभट्ठयांवर धाडी

By team
On: November 27, 2023 10:54 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी मुळेगाव तांडा व सिताराम तांडा येथील हातभट्ठयांवर धाडी टाकून आठ गुन्ह्यात अडीचशे लिटर हातभट्टी दारू व तेवीस हजार आठशे पन्नास लिटर गुळमिश्रित रसायनासह साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सोलापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाने अधीक्षक नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वात मुळेगाव तांडा व सिताराम तांडा येथील हातभट्टी ठिकाणांवर धाडी टाकल्या. या छापा कारवाईत निकिता शाखा पवार (वय १९), अनिता राजू पवार (वय ३५, दोघी रा. मुळेगाव तांडा) व संजय बाळू चव्हाण (वय ३५, रा. सिताराम तांडा) यांच्या घरातून एकूण २५० लिटर हातभट्टी दारु व गुळमिश्रित रसायन जप्त करुन जागीच नष्ट केले. पहाटेच्या सुमारास टाकलेल्या धाडी दरम्यान अंधाराचा फायदा घेऊन पाच आरोपी पळून गेल्याने त्यांना फरार घोषित करण्यात आले असून त्यांचा शोध तपास अधिकारी करीत आहेत.
ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपआयुक्त विजय चिंचाळकर यांच्या आदेशान्वये व अधीक्षक नितिन धार्मिक यांच्या नेतृत्वाखाली उपअधीक्षक गुणाजी क्षीरसागर, निरिक्षक सदानंद मस्करे, राहूल बांगर, दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, अक्षय भरते, मानसी वाघ, रोहिणी गुरव, कृष्णा सुळे, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, अलीम शेख, जवान किरण खंदारे, अनिल पांढरे, इस्माईल गोडीकट, अशोक माळी, शोएब बेगमपुरे, चेतन व्हनगुंटी, वसंत राठोड, योगीराज तोग्गी, वाहनचालक रशिद शेख, दिपक वाघमारे व संजय नवले यांनी पार पाडली.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!