---Advertisement---

सोलापूर : पत्नी व मुलाची हत्या करीत स्वत:ला संपवल !

By team
On: November 28, 2023 2:19 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारी घटना घडत असतांना सोलापूर जिल्ह्यातील एका तालुक्यात अंगाचा थरकाप उडवणारी घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली आहे. एका शिक्षकाने आपल्या पत्नीचा गळा चिरून खून त्यानंतर पोटच्या ५ वर्षीय मुलाची देखील हत्या केली असून शिक्षकाने स्वत:ला देखील संपविल्याची थरारक घटना बार्शी तालुक्यात उघडकीस आली आहे. यात अतुल मुंढे असं मृत शिक्षकाचं नाव असून तृप्ती मुंढे आणि ओम मुंढे अशी हत्या झालेल्या माय-लेकांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच बार्शी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह ताब्यात घेतले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत अतुल मुंढे हे शिक्षक म्हणून कार्यरत होते. अतुल यांच्या पत्नी तृप्ती या बार्शीतील अभिनव प्राथमिक शाळेत शिक्षका असून दोघांना ५ वर्षांचा मुलगा नाव ओम देखील होता. सगळं काही सुरळीत सुरू असताना मंगळवारी दुपारच्या सुमारास अतुल मुंढे यांनी पत्नी तृप्ती यांची चाकूने गळा चिरुन हत्या केली. त्यानंतर त्यांनी मुलगा ओम याचा देखील उशीने तोंड दाबून खून केला. या संपूर्ण घटनेनंतर अतुल यांनी देखील स्वत: गळफास घेत आपली जीवनयात्रा संपवली. दरम्यान, शिक्षक दाम्पत्याच्या मृत्यूची घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली. मृतांच्या घरासमोर बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!