---Advertisement---

मुलीचा बस्ता बांधून येतांना वधूपित्याचा दुर्देवी मृत्यू !

By team
On: December 3, 2023 9:50 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

बार्शी येथे दिवसभर मुलीचा लग्नाचा बस्ता बांधून गावी कारी येथे परतणाऱ्या पित्यावर काळाने घाला घातला असून बार्शी – धाराशिव रस्तावर दर्शना सोयाबिन मिल नजीक रोडवर टॅम्पोने जोराची धडक दिल्याने मोटारसायकलवरील चालक पिता अपघातात गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव जिल्ह्यातील कारी येथील संदिप मारुती गादेकर (वय ४५) हे दि.१ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता मुलीचे लग्न असल्याने त्याच्या तयारीसाठी बार्शी येथे लग्नाचा बस्ता बांधण्याकरीता मुलगा तेजससह दोन मोटारसायकल घेवून आले होते. दोघांनी दिवसभर लग्नाचा बस्ता व इतर खरेदी करून झाल्यानंतर सायंकाळी ६.३० वाजण्याचे सुमारास मुलगा तेजस हा एका मोटारसायकल वरून बस्ता घेऊन गावी कारी येथे घरी पोहचला. तर पाठीमागून सायं. ७ वाजता दुसऱ्या मोटारसायकलवरून संदीप गादेकर हे बार्शी वरून गावी जात असताना कदम वस्ती सोयाबीन प्लांट नजीक आले असता दरम्यान बार्शीच्या दिशेने समोरून येणाऱ्या टेम्पो (क्रमांक एम.एच.२५/ए.जे ५१४०) ची मोटारसायकलला जोराची धडक बसल्याने संदीप गादेकर यांच्या डोक्यास व पायाला गंभीर जखमा होवून जागीच मयत झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मयताचा भाऊ किरण मारुती गादेकर याने दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!