---Advertisement---

करणी सेनेच्या राष्ट्रीय अध्यक्षाची भरदिवसा हत्या

By team
On: December 5, 2023 4:47 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

राजस्थान राज्यातील श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुखदेव सिंग गोगामेडी यांची जयपूरमध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवारी भरदिवसा घडली आहे. स्कूटीस्वार आरोपींनी गोगामेडी यांच्यावर गोळीबार केला. यानंतर आरोपी पळून गेले. गोगामेडी यांना मेट्रो मास हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. गोगामेडी यांच्यासोबत घटनेवेळी उपस्थित असलेले अजित सिंह गंभीर जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखदेव सिंग गोगामेडी हे मंगळवारी दुपारी 1.45च्या सुमारास श्याम नगर जनपथवरील घराबाहेर उभे होते. दरम्यान, एका स्कूटरवरून दोन आरोपी आले. गोगामेडी यांच्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला. माहिती मिळताच श्यामनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले. सुखदेव सिंह गोगामेडी हे दीर्घकाळ राष्ट्रीय करणी सेनेशी संबंधित होते. करणी सेना संघटनेतील वादानंतर त्यांनी राष्ट्रीय राजपूत करणी सेना या नावाने वेगळी संघटना स्थापन केली होती. गोगामेडी त्याचे अध्यक्ष होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!