---Advertisement---

कंबर तलावाजवळ अपघात : १३ वर्षाचा मुलगा गंभीर

By team
On: December 14, 2023 3:31 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : प्रतिनिधी

विजापूर रोडवरील कंबर तलाव परिसरात दुचाकी व छोटा हत्ती टेम्पोचा अपघात झाला. या अपघातात १३ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात ५ डिसेंबर २०२३ रोजी घडला असून, याबाबत ११ डिसेंबर २०२३ रोजी सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील अनुविश्व हौसिंग सोसायटीतील रहिवासी रचना बसवराज बंकापूर (वय ३७) यानी फिर्याद दिली असून शांतलिंग शिवरूद्र केगाव (दिलदयाल नगर, ताई चौक, सोलापूर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ५ डिसेंबर २०२३ रोजी फिर्यादीचा मुलगा साईस्वरूप हा फिर्यादीच्या भावास डबा देऊन घरी परत सात रस्ताहून विजापूर रोडकडे येत असताना कंबर तलाव येथे पाठीमागून येत असलेला टेम्पो क्रमांक एमएच ०४, एफपी ५५०८ ने फिर्यादीच्या मुलाच्या सायकलीस पाठीमागून जोराची धडक दिली. या धडकेत तेरा वर्षीय साईस्वरूप हा गंभीर जखमी झाला आहे. साईस्वरूप याच्या डोक्यास, पाया, हातास जखम झाली असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेची माहिती मिळताच बंकापूर परिवारातील नातेवाईकांनी साईस्वरूप याच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले. या घटनेची नोंद सदर बझार पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास महिला पोलिस नाईक वाघमोडे या करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!