---Advertisement---

भिकाऱ्याने केला महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर हल्ला !

By team
On: December 16, 2023 9:24 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशभरातील अनेक धक्कादायक घटना सोशल मिडीयावर व्हायरल होत असतात अशीच एक घटना व्हायरल झाली आहे. हि घटना मुंबई येथील असल्याचे देखील समजते. याठिकाणी एका भिकाऱ्याने महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या डोक्यावर काचेच्या बाटलीने प्रहार केला. नंतर त्याचं फुटलेल्या काचेच्या बाटलीने तिच्यावर सपासप वार केले. ज्यात ही तरुणी गंभीर जखमी झाली. हि घटना दि.४ डिसेंबर रोजी घडली असून या घटनांतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे. इमाम हसन शमशुद्दीन, असं या हल्लेखोरचं नाव आहे. या 21 वर्षीय पीडितेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईतील ऐरोली परिसरात राहणारी ही तरुणी मित्रासोबत नेरूळ येथील एका महाविद्यालयात आली होती. दुपारी दीडच्या सुमारास ती या परिसरातील एका बसस्थानकावर उभी असताना हा भिकारी घटनास्थळी आला. कोणताही आवाज न करता या भिकाऱ्याने काचेच्या रिकाम्या बाटलीने तिच्यावर हल्ला केला, अशी माहिती नेरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली. आरोपीने आधी तरुणीच्या डोक्यावर वार केले आणि नंतर काचेच्या तुकड्यांनी तिच्या पोटात वार केला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली. अधिकाऱ्याने सांगितले की, शमशुद्दीनने पीडितेवर हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

याप्रकरणी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अधिकाऱ्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले. यानंतर माहिती गोळा करून आरोपीला अटक करण्यात आली. आरोपी हा मानसिकदृष्ट्या अस्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. शमशुद्दीनने तरुणीवर हल्ला का केला? याआधीही त्यांनी असं कृत्य केलं आहे का? याचा पोलीस तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!