---Advertisement---

पुण्यात १० सिलिंडरचा स्फोट !

By team
On: December 27, 2023 3:58 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक मोठ्या शहरात सिलिंडरचे स्फोट झाल्याच्या घटना घडत असतांना नुकतेच पुणे शहरातून देखील अशीच एक बातमी समोर आली आहे. पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या भिंतीजवळच सिलिंडरचे स्फोट झाला असून एकामागोमाग १० सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती मिळते. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील लोहगाव विमानतळाच्या भिंतीजवळ सिलिंडरचे स्फोट झाले. १० सिलिंडरचे स्फोट झाले. या परिसरात सिलिंडरचा बेकायदा साठा ठेवल्याची माहिती मिळते. स्फोट झाला त्या परिसरात आणखी ५० सिलिंडर असल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!