---Advertisement---

मोठी बातमी : पुण्यात कुख्यात गुंड मोहोळवर गोळीबार !

By team
On: January 5, 2024 3:56 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील पुणे शहरात गेल्या काही वर्षापासून अनेक गुन्हेगारी घटनेमुळे चर्चेत येत असतांना नुकतेच कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर काेथरुड परिसरातील सुतरदार याठिकाणी दुचाकीवर आलेल्या अज्ञात हल्लेखाेरांनी गाेळीबार केल्याची घटना शुक्रवारी घडली आहे. गोळीबारानंतर उपचारादरम्यान शरद माेहाेळ यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान, शरद माेहाेळ यास हल्लेखाेरांच्या हल्लयात एक गाेळी शरीरावर लागली होती. त्यास उपचारासाठी सहयाद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान, उपचार सुरु असताना त्याचा प्राणज्योत मालवली. काेथरुड पोलिस ठाण्याचे वरिेष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी माहिती दिली. शुक्रवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास हल्लेखाेर यांनी शरद माेहाेळ यास काेथरुड परिसरातील सुतारदरा मध्ये पाठलाग करत गाठले. त्यानंतर थेट हल्लेखाेरांन साेबत आणलेल्या पिस्तुलमधून गाेळी माेहाेळ याच्या दिशेने झाडली.

यामध्ये माेहाेळ जखमी हाेऊन खाली काेसळला त्यानंतर हल्लेखाेर घटनास्थळावरुन घाईगडबडीत पसार झाले. याबाबतची माहिती मिळताच, काेथरुड पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सदर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन आराेपींचा शाेध सुरु केला आहे. त्याचसाेबत गुन्हे शाखेचे पोलिस देखील काेथरुड मध्ये दाखल हाेऊन त्यांनी हल्लेखाेरांचा माग काढणे सुरु केले. पूर्ववैमनस्यातून सदरचा गाेळीबार करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी वर्तवला आहे. सध्या शरद माेहाेळ याने माेठया प्रमाणात सामाजिक कार्यक्रम सुरु केल्याने त्याचे राजकीय पुर्नवसनची चर्चा सुरु झाली हाेती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!