---Advertisement---

फेब्रुवारीत मंत्रीमंडळ जाणार प्रभू श्रीरामांचे दर्शनाला

By team
On: January 23, 2024 9:37 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

देशात अयोध्या येथे प्रभू श्रीराम विराजमान झाले आहे. त्यासाठी फेब्रुवारीत एकत्रित मंत्रिमंडळासह अयोध्याला जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी घेतला आहे. मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्तांना सर्वांना घेऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन आम्ही घेणार आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण सत्ताधारी मंत्र्यांबरोबरच विरोधकांनाही देण्यात आले होते. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य विरोधकांनी सोहळ्याला न जाता नंतर दर्शनाला जाणार असल्याचे सांगितले.

तारीख लवकरच : मुख्यमंत्री
देशवासीयांसाठी अभिमानास्पद अशा अभूतपूर्व क्षणाचे साक्षीदार फक्त्त मी, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार असे तिघांनीच होण्याऐवजी संपूर्ण मंत्रिमंडळ, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी आणि राज्यातील रामभक्तांना सर्वांना घेऊन प्रभू श्रीरामांचे दर्शन आम्ही घेणार आहोत. अयोध्येतल्या दर्शनाची तारीख आणि वेळ लवकरच ठरवत आहोत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

योग्य निर्णय : अजित पवार
मी आणि मुख्यमंत्री अयोध्येला जाणार होतो. परंतु, मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला. ते मला म्हणाले, कार्यक्रमाला केवळ आपण दोघेच न जाता काही दिवसांनी आपले संपूर्ण मंत्रिमंडळ घेऊन अयोध्येला जाऊया. राज्याच्या प्रमुखांनी हा निर्णय घेतला आहे. तो योग्यच आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!